लक्ष्मण हाकेला कोल्हापुरीनं हाणून, चप्पलेचा हार घालणाऱ्याला 1 लाख 11 हजार… कुणी केलं बक्षीस जाहीर
मनोज जरांगे पाटील समर्थक धनाजी साखळकर यांनी एक अनोखं बक्षीस जाहीर केलंय. लक्ष्मण हाके यांना कोल्हापूर चप्पलेने मारणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस धनाजी साखळकर यांनी जाहीर केलंय.
येत्या गणेशोत्सवात २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत मराठा आरक्षणासाठी धडकणार आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. अशातच ओबीसी आरक्षण संपवणे हा मनोज जरांगे पाटील यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. दरम्यान, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसी समाजाची संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा हाकेंनी केली आहे. यानंतर जरांगे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
इतकंच नाहीतर जो कोणी कोल्हापूरी चपलेने लक्ष्मण हाकेला मारेन आणि त्याला चपलेचा हार घालेन त्याला एक लाख अकरा हजार रुपयांचं बक्षीस मी जाहीर करतो, असं बक्षीसच जरांगे समर्थक धनाजी साखळकर यांनी जाहीर केलं. पुढे ते असेही म्हणाले की, लक्ष्मण हाके सोलापूरमध्ये फिरकले तर ओबीसी, मराठा आणि दलित समाजाकडून त्यांना चपलेचा हार घातला जाईल.
