शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर
नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मलिकांची ईडी पुर्णपणे चौकशी करणार असल्यामुळे त्यांना ईडीच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मलिकांची ईडी पुर्णपणे चौकशी करणार असल्यामुळे त्यांना ईडीच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मलिकांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजपाचे राज्यभर कार्यकर्ते आंदोलन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल मंत्रालयासमोर धरण आंदोलन सुध्दा केलं आहे. नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे, आमदार प्रताप सरनाईक, परिवनह मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आनंदराव अडसूळ इत्यादी नेते रडारवर असल्याने यांच्यावरती कधीही छापेमारी होऊ शकते अशी देखील चर्चा आहे. नवाब मलिकांना अटक केल्यापासून महाराष्ट्रात काल महाविकास आघाडीकडून धरणं आंदोलन करण्यात आलं तर भाजपकडून नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आलं.
