…तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट

…तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट

| Updated on: May 30, 2026 | 11:27 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून या आंदोलनाला अनेकांकडून पाठिंबा दर्शवला जात आहे. जरांगे यांनी सरकारकडून लेखी आश्वासन आणि मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या आंदोलनाबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय, ती म्हणजे जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाबाबच्या मागण्यांना शाहू महाराजांनी पाठिंबा दर्शवला आहे. इतकेच नाही, तर त्यांनी सांगितले, अनेक वर्षांपूर्वी जो मराठा युद्ध लढायचा तो युद्धातून परत आल्यावर शेती करायचा, त्यामुळे एकाच समाजातील एकाला आरक्षण आणि दुसऱ्याला नाही हे गैर आहे. त्यामुळे मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले तर उद्रेक होईल. शाहू महाराजांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वातावरण पेटले आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील अजूनही आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत.

नुकतेच राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यसााठी आलेत. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. विखे पाटलांनी त्यांना सावलीत बसण्याची वारंवार विनंती केली.

Published on: May 30, 2026 11:27 AM
Follow Us