‘चांगली खेळलीस तू’च्या निमित्ताने विनय देशमुख, रुचिरा जाधव यांच्याशी खास बातचीत, पाहा व्हीडिओ…
“प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं” असं म्हणतात, पण खरंच सगळ्यांचं प्रेम सेम असतं का? जर प्रेम सेम असेल तर ब्रेकअप पण सेम असतं का? मनापासून जोडलेलं नातं जेव्हा तुटतं किंवा ब्रेकअप होतं तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल… ती व्यक्ती मनाने किती खचून गेली असेल… असंच काहीसं झालंय अभिनेता विनय […]
“प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं” असं म्हणतात, पण खरंच सगळ्यांचं प्रेम सेम असतं का? जर प्रेम सेम असेल तर ब्रेकअप पण सेम असतं का? मनापासून जोडलेलं नातं जेव्हा तुटतं किंवा ब्रेकअप होतं तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल… ती व्यक्ती मनाने किती खचून गेली असेल… असंच काहीसं झालंय अभिनेता विनय प्रतापराव देशमुख याच्यासोबत आणि म्हणूनच तो म्हणतोय “चांगली खेळलीस तू… भावनांशी माझ्या चांगली खेळलीस तू…!” (Changali Khelalis Tu) अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav), सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि विनय प्रतापराव देशमुख (Vinay Prataprao Deshmukh) यांचं एक नवं ब्रेकअप सॉंग (BreakUp Song) रिलीज झालंय. त्यानिमित्त विनय देशमुख आणि रुचिरा जाधव यांच्याशी आम्ही बातचित केली. व्हॅलेंटाईन विकमध्ये ब्रेकअप साँग का आणलं? ब्रेकअपमागची कारणं काय? त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे काय अश्या अनेक प्रश्नांची उत्तर आम्ही जाणून घेतली. विनय प्रतापराव देशमुखने अभिनयासह या गाण्याचं दिग्दर्शन देखील केलं आहे.‘रिफील मराठी’ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला हे गाणं पाहता येईल.
