Ghatkopar News : गुजराती भावांची मराठी कुटुंबाला मारहाण, मुंबईत पुन्हा मराठी माणसाची गळचेपी
Marathi Family Beaten : मुंबईत मराठी अमराठीचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. 3 गुजराती भावांनी एका मराठी कुटुंबाला मारहाण केली असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
घाटकोपरमध्ये एका मराठी कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुत्रा पाळल्याच्या कारणावरून एका गुजराती कुटुंबाने ही मारहाण केली असल्याचा आरोप या मराठी कुटुंबाने केला आहे. घाटकोपरच्या रायगड चौक परिसरात राहणाऱ्या मराठी कुटुंबाचा हा आरोप आहे. 3 भावांकडून मारहाण झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठी माणसासोबत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाषिक वाद देखील सुरू आहे. त्यातच मुंबईत अनेक ठिकाणी मराठी माणसाची गळचेपी केल्याचा प्रकार देखील घडतांना दिसून येत आहे. वरांवर अशा घटना घडत आहे. घाटकोपर मधून देखील आता ही घटना समोर आली आहे. या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता यावर मनसेकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
