Nitin Gadkari | नागपुरात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Nitin Gadkari | नागपुरात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 9:23 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. राज्यातील प्रमुख पक्षांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळी तयारी सुरु केली आहे. भाजपनेही आता विविध शहरातील कारभारी-नेते मंडळींवर विशेष जबाबदारी सोपविण्याचं ठरवलं आहे. त्याच्याच रणनितीचा एक भाग म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फडणवीस-गडकरींमध्ये बैठक पार पडली. परंतु या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.