Special Report | लखीमपुर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाला अखेर बेड्या

| Updated on: Oct 10, 2021 | 11:19 PM

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आशिष मिश्राला शनिवारी (9 ऑक्टोबर) सकाळी ताब्यात घेतलं होतं.

Follow us on

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आशिष मिश्राला शनिवारी (9 ऑक्टोबर) सकाळी ताब्यात घेतलं होतं. त्याची जवळपास 12 तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. सहारनपूरचे डीआयजी उपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती दिली. “अनेक तासांपासून सुरु असलेल्या चौकशीत आशिष मिश्राने सहकार्य केलं नाही. तो अनेक गोष्टी सांगू इच्छित नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल”, अशी माहिती उपेंद्र यादव यांनी दिली आहे. पोलिसांनी आशिष मिश्राला खून, गुन्हेगारी कट, बेपर्वा ड्रायव्हिंगची कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.