Atul Save : तो आला अन् त्यानं दगड भिरकवला, मंत्री अतुल सावेंच्या कारवर हल्ला, नेमकं घडलं काय?
छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीत गाडीची काच तुटली. पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा तरुण मानसिक आजारी आहे.
मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर येथे दगडफेक करण्यात आली. ही घटना पुंडलिकनगरच्या कार्यालयाबाहेर घडली. आज शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अतुल सावे हे आपल्या कार्यालयात होते. यावेळी त्यांची गाडी कार्यालयाच्या समोर उभी होती. यावेळी एका तरुणाने अतुल सावेंच्या गाडीवर दगड भिरकावला. तरूणाने फेकलेल्या दगडामुळे गाडीच्या पुढच्या भागाला नुकसान झाले आहे आणि काच तुटली आहे. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण मनोरूग्ण असल्याचे समजते. घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.
Published on: Sep 20, 2025 04:10 PM
