तर माझंही नाव रामदास कदम, दिलेल्या इशाऱ्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया
पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आलेत, त्यांचा केसानं गळा कापू नये, भविष्यात वेगळा संदेश भाजपमधून जात आहे, याचं भान भाजपच्या काही नेत्याना असावं, असे म्हणत रामदास कदम यानी भाजपवर आगपाखड केली. या टीकेनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली
मुंबई, ७ मार्च २०२४ : मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय, भाजपने केसानं गळा कापू नये, असे म्हणत शिवसेनेचे नेते रामदास कदम हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कान टोचावे, पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आलेत, त्यांचा केसानं गळा कापू नये, भविष्यात वेगळा संदेश भाजपमधून जात आहे, याचं भान भाजपच्या काही नेत्याना असावं, असे म्हणत रामदास कदम यानी भाजपवर आगपाखड केली. या टीकेनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘मी बांधकाम मंत्री झाल्यानंतर त्या सर्व मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागातून सर्वाधिक निधी दिला आहे. पण त्यांची नाराजी कशा बद्दल आहे हे माहीत नाही. मी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी चर्चा करीन. योगेश माझा मित्र आहे मी त्याच्याशी मी चर्चा करीन’, असेही त्यांनी म्हटले.
