वादग्रस्त वक्तव्याचा सिलसिला सुरूच, कुणाची कानशिलात लगावण्याची भाषा तर कुणी काढला बाप अन्…
सत्तेतल्या प्रमुख नेत्यांनी समज दिल्यानंतर सुद्धा अनेक नेत्यांची विधाने वादामध्ये सापडतायत. राज्यमंत्री मेघना बोर्डिकरांनी एका ग्रामसेवकाला तंबी देताना कानशिलात मारण्याची धमकी दिली. तर दुसरीकडे निधी हवा तितका मागा पैसा सरकारचा असल्यामुळे आपल्या बापाचं काय जातंय असं विधान मंत्री शिरसाट यांनी केलंय.
मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या वाचाळवीर नेत्यांना खरोखर समज दिलीये का? किंवा समज देऊनही सरकारचा मंत्र्यांवर वचक उरलेला नाही असे प्रश्न पुन्हा काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उभे राहिले. कितीही पैसा मागा लगेच मंजूर करतो. पैसा सरकारचा असल्याने आपल्या बापाचं काय जातंय असं शिंदे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणतायत.
तर दुसरीकडे कुणाच्या सालगड्यासारखं काम केलं तर कानाखाली घालेन असं भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डिकर एका ग्रामसेवकाला धमकावतायत. मी वाकडं काम करून जर ते नियमात दाखवलं तर त्याच गोष्टीची लोक नोंद घेतात असं स्वतः अजित दादा गटाचे नव्हे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. ग्रामसेवकाला कानात मारण्याच वक्तव्य आपण रागातून केल्याचं मंत्री बोर्डिकर यांनी म्हटलंय. शिवाय पोलिसांना दम देणाऱ्या रोहित पवारांनी आम्हाला सांगू नये असं उत्तरही बोर्डिकर यांनी दिले. मात्र दुसरीकडे बोर्डिकरांचे वडील पोलिसांना आईवरून अत्यंत घाणेरडे शिवी देत असताना मेघना बोर्डिकर टाळ्या कशा वाजवतात असा एक प्रश्न जुना व्हिडिओ पोस्ट करत पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
