Maharashtra Assembly : BJP च्या 12 आमदारांच्या निलंबनावर MLA Jayakumar Rawal यांची प्रतिक्रिया
आम्ही विनंती केली, आग्रह केला, परंतु आमची मुस्कटदाबी करुन तो मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांचं हे राजकीय षडयंत्र करुन एक तास स्थगित करुन, प्लानिंग करुन, खोटेनाटे आरोप करुन हे षढयंत्र केलं. (MLA Jayakumar Rawal's reaction to the suspension of 12 BJP MLAs)
मुंबई : आमच्यासाठी ओबीसी, व्हिजेएनटीचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आमच्या मतदारांनी आम्हाला सांगतिलं की आमचं ओबीसीचं जे राजकीय आरक्षण गेलं ते विधानसभेत मागा. विधानसभेत जेव्हा तो मुद्दा आला तेव्हा आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही विनंती केली, आग्रह केला, परंतु आमची मुस्कटदाबी करुन तो मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांचं हे राजकीय षडयंत्र करुन एक तास स्थगित करुन, प्लानिंग करुन, खोटेनाटे आरोप करुन हे षढयंत्र केलं. आमचे ओबीसी, व्हिजेएनटी मतदार आमच्या सोबत आहे. आमचं काम विधानसभेत जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणं हे आहे. आम्हाला बोलू पण देणार नाही काय फायदा आहे. आमच्या जनतेसाठी आम्ही बोलू, भांडू आणि करु, अशी प्रतिक्रिया भाजपचे निलंबित आमदार जयकुमार रावल यांनी दिली आहे.
