Hingoli : शिंदे गटातील चर्चेतील आमदार संतोष बांगर यांची घोडेस्वारी, पदयात्रेत सहभाग

Hingoli : शिंदे गटातील चर्चेतील आमदार संतोष बांगर यांची घोडेस्वारी, पदयात्रेत सहभाग

| Edited By: | Updated on: Aug 21, 2022 | 8:53 PM

आमदार संतोष बांगर हे मौजे अंजनवाडी ते मौजे अंजनवाडा महादेव या पदयात्रेस भेट देऊन पालखीचे दर्शन घेतले आणि पदयात्रेतील घोड्यावर स्वार होत घोडेस्वारी देखील केली. त्यांनी घोडेस्वारी तर केलीच पण भाविकांसोबत ते पदयात्रेतही सहभागी झाले होते.

हिंगोली : संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यापासून कायम चर्चेत राहिलेले आहेत. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे राजकीय वर्तुळात ते केंद्रस्थानी राहिलेले आहेत. शिंदे गटात प्रवेश करताच जर कोणी गद्दार म्हणेल त्याच्या कानशिलात लावा असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर एका रुग्णाच्या उपचारावरुन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यादेखील धमकीचा फोन केला होता. हे कमी म्हणून की काय गेल्या आठवड्यात त्यांनी एका उपहागृहाला भेट देत कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करीत उपहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात दिली होती. आता तेच आमदार संतोष बांगर हे मौजे अंजनवाडी ते मौजे अंजनवाडा महादेव या पदयात्रेस भेट देऊन पालखीचे दर्शन घेतले आणि पदयात्रेतील घोड्यावर स्वार होत घोडेस्वारी देखील केली. त्यांनी घोडेस्वारी तर केलीच पण भाविकांसोबत ते पदयात्रेतही सहभागी झाले होते. यावेळी जि.प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,रामजी नागरे,नगराध्यक्ष कपिल खंदारे, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, अनिलभाई देशमुख,अनिल देव,सौ.शीतल विष्णू पवार,प्रदीप कनकुटे, मनोज देशमुख, दिलीपकुमार राठोड उपस्थित होते.

Published on: Aug 21, 2022 08:53 PM