Shahajibapu Patil | “कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत”, सामनातील टिकेवर आमदार शहाजीबापू पाटील यांचे इरसाल उत्तर
Shahajibapu Patil | सामनातील टिकेवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दमदार उत्तर दिले आहे. त्यांनी गद्दार नसून खुद्दार असल्याचे पुन्हा एकदा ठासून सांगितले आहे.
Shahajibapu Patil | “कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत”, सामनातील (Saamana Newspaper) टिकेवर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदार गद्दार नसून खुद्दार असल्याची भूमिका पुन्हा ठासून सांगितली. आमचं आता काय होणार याची चिंता सामना वृत्तपत्राने करण्याची गरज नाही. आता त्यांचे अस्तित्व किती राहिले याचे आत्मचिंतन करावे असा टोला ही त्यांनी लगावला. शिंदे गटाने शिवसेनेत (Shivsena) बंड केले आणि ते बाहेर पडले या धक्क्यातून शिवसेना अद्यापही बाहेर आलेली नाही. या धक्क्यामुळे शिवसेना अजूनही अंधारात चाचपडल्यासारखी करत आहे. या निराशेतूनच त्यांनी खोके संघटनेचा धोसा लावला. आमदारांची बदनामी सुरु केल्याचे सांगितले. त्यांना योग्य टीका करता येत नसल्याने सवंग प्रसिद्धीचा हा प्रकार असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.
