Pritam Munde | ओबीसींशी देणघेण नाही का? एकाच जातीसाठी सरकार चालवताय का? प्रीतम मुंडेंचा मविआला सवाल

Pritam Munde | ओबीसींशी देणघेण नाही का? एकाच जातीसाठी सरकार चालवताय का? प्रीतम मुंडेंचा मविआला सवाल

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 6:13 PM

सर्व मराठा आरक्षणाविषयी बोलत आहेत. मराठा आरक्षणाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी समर्थन दिलं होतं. पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती.

नवी दिल्ली : आरक्षण देऊ शकलो नाही या भीतीमुळे तर विरोधकांना कळवळा येत नाही ना? हा प्रश्न या माध्यमातून विचारत आहे. सर्व मराठा आरक्षणाविषयी बोलत आहेत. मराठा आरक्षणाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी समर्थन दिलं होतं. पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. ज्या लोकांना ठरावीक समाजाचा ठरावीक समुहाचा कळवळा येत आहे, त्यांना ओबीसींशी काही घेणं देणं नाही का? ओबीसींना केवळ व्होटबँक म्हणून पाहणार आहोत का? 50 टक्क्यांचं सिलिंग काढण्यासाठी काही पक्ष मागणी करत आहेत. 50 टक्के मर्यादा काढणं हा पुढचा प्रश्न आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली हे राज्य सरकारने स्वत: कोर्टात कबूल केलं आहे. तेव्हा आमच्या अधिकाराचं आरक्षण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही एका ठरावीक जाती किंवा समाजासाठी सरकार चालवत आहात का? ओबीसींशी तुमचं काही घेणं देणं नाही का?, असा सवाल खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे.