ShivJayanti साजरी करण्यावर कुणी निर्बंध लावू शकत नाही- अमेय खोपकर

ShivJayanti साजरी करण्यावर कुणी निर्बंध लावू शकत नाही- अमेय खोपकर

| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 12:40 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Mns) दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती (Shivjayanti) जोरदार साजरी केली जाते. ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परिसरात होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Mns) दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती (Shivjayanti) जोरदार साजरी केली जाते. ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परिसरात होत आहे. मात्र या कार्यक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्यांवरून अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर टीका केली. “आज जल्लोष करण्याचा दिवस आहे. जयंती जल्लोषात साजरी करण्याचा दिवस आहे. या सरकारने जे घाणेरणं राजकारणं आमच्याशी खेळलेलं आहे, ते निंदनीय आहे. शिवसेनेच्या लोकांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती,” असं ते म्हणाले.