Maharashtra Politics : हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासाठी मनसेकडून काँग्रेसला फोन, काय झालं बोलणं?

Maharashtra Politics : हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासाठी मनसेकडून काँग्रेसला फोन, काय झालं बोलणं?

| Updated on: Jun 27, 2025 | 4:17 PM

'दोन्ही बंधू हिंदी सक्ती विरोधात एकत्र येत असतील तर आम्हाला निश्चितच त्याचा आनंद आहे, आणि या निमित्ताने दोन्ही भावांच्या एकत्रिकरणाचं पुढचं पाऊल टाकलं जात असेल तर आमची भूमिका समर्थनातच आहे.', असं वडेट्टीवार म्हणाले.

येत्या पाच जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रितरित्या मोर्चा काढणार आहे. यानिमित्ताने हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच हिंदी सक्ती विरोधातील मोर्चासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काँग्रेसला फोन गेल्याची माहिती समोर येत आहे. मोर्चासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना फोन गेला आहे.

यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, कालच मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता आणि त्यांनी मोर्चात सामील होण्याची विनंती केली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. यासह जितेंद्र आव्हाड देखील यावर बोलताना म्हणाले की, मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी जे आवाहन केलं की, पक्षीय राजकारण मतभेद बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र येऊन मराठीसाठी मोर्चात सहभागी व्हा. आम्ही मराठी भाषेचे भक्त आहोत. मराठी भाषेतून आम्हाला शक्ती मिळते. मातृभाषा ही आमची कुमकूम तिलक आहे, असं आव्हाड म्हणाले.

Published on: Jun 27, 2025 04:17 PM