Avinash Jadhav : आता तो सदावर्ते कुठे आहे? कल्याण घटनेवरून अविनाश जाधव संतापले
कल्याण मराठी तरुणी मारहाण प्रकरणी अविनाश जाधव यांनी भाजप आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे.
त्या मुलीला ज्या प्रकारे मारले त्याचा हे पक्ष समर्थन करत आहेत का. परवा ही घटना घडली असे एखाद्या परप्रांतीच्या कानाखाली मारल्यानंतर धावत येणारे तो सदावर्ते किंवा भाजपचे नेते गायब आहेत. कारण त्यांना आदेश नाहीत त्यांच्या पक्षाचे ते आदेशावर चालणारे लोक आहेत त्यांना एक स्क्रिप दिलेले लोक आहेत आणि ती स्क्रिप्ट ते लोक वाचतात, अशी खोचक टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपवर केली आहे. आज कल्याण मारहाण प्रकरणात समोर आलेल्या दुसऱ्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार पतिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, जाऊन समोर बोलतात इसको मारा उसको मारा हे सर्व मराठीच्या विरोधात आहेत महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. एक ट्विट आणि एक बाईट नाहीये साधी त्या लोकांची. एका मराठी मुलीला मारल्यानंतर कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या जे लोक मराठी माणसाच्या विषयी सोशल मीडियावरून गरळ ओकणारे परप्रांतीयासाठी येणारे लोक गायब आहेत.
