Avinash Jadhav : तू रडू नको.. बदला घेणारच, त्या हातांचा बंदोबस्त करू, कल्याणच्या पीडितेला अविनाश जाधवांचा शब्द अन्…

Avinash Jadhav : तू रडू नको.. बदला घेणारच, त्या हातांचा बंदोबस्त करू, कल्याणच्या पीडितेला अविनाश जाधवांचा शब्द अन्…

| Updated on: Jul 22, 2025 | 7:39 PM

आम्ही तुला आता रुग्णालयात दाखल करतो. तुझ्या उपचाराचा जो काही खर्च होईल तो आम्ही मनसे पक्षातर्फे करू.. आम्ही तुला मारहाण करणाऱ्याला शोधतो, असे म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरूणीला धीर दिला.

कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये एका खाजगी रुग्णालयामधल्या रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना समोर आली.  या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये त्या तरूणाने तरूणीला अमानुषरित्या मारहाण केल्याचे पाहायला मिळत आहे. या घडलेल्या प्रकारानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेतली. यानंतर तिच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द त्या तरूणीला दिला. त्या आरोपीचा हात फक्त सापडायला हवेत, असं म्हणत अविनाश जाधव यांनी झालेला सर्व प्रकार पीडित तरुणीकडून जाणून घेतला.

या भेटीदरम्यान अविनाश या तरूणीला धीर देत म्हणाले, ताई तुला आज सांगतो. तू रडू नको त्या शोधतो मी…कसा शोधायचा ते…आम्ही तुझा बदला घेणार. ज्या हातांनी तुला मारलं त्याच हातांचा आम्ही बंदोबस्त करणार. तू बेफिकीर रहा. तू उपचार घे आता.. तोपर्यंत आम्ही त्याला शोधतो. पोलिसांच्या हाताला लागला तर ठीके आमच्या हाताला लागला तर तुझा बदला आम्ही घेणार, असा शब्दच अविनाश जाधव यांनी पीडित तरूणीला दिला.

Published on: Jul 22, 2025 07:35 PM