‘…त्यांनी केले ते प्रेम आम्ही केला तर बलात्कार…’,काय म्हणाले राज ठाकरे
राज ठाकरे यांनी विधानसभेतील दारुण पराभवानंतर प्रथमच आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यावर भूमिका बदलल्याचा आरोप केला जातो याविषयी त्यांनी अनेक पक्षाचे दाखले देत समर्थन करण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे यांनी वरळी येथील मेळाव्यात जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी राज ठाकरे हे नेहमी भूमिका बदलतात या आरोपाचा चांगलाच समाचार घेतला.भाजपाने २०१५ ला मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी युती केली,त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची मुलगी मेहबूबा मूफ्ती सईदला पाठींबा दिला.या मुफ्ती सईद यांच्या मुलीचे अपहरण केले म्हणून भारताला अतिरेकी सोडावे लागले होते. मेहमूबा मूफ्तींना मुख्यमंत्री केले नंतर त्यांचे भाजपाने सरकार पाडले. आणि राष्ट्रपती राजवट आणली तिथे कोणी बोलणार नाही की भूमिका बदलली? राधाकृष्ण विखे पाटील, आधी काँग्रेसमध्ये नंतर विरोधीपक्ष नेते होते, नंतर २०२२ त २४ काळात महसूल मंत्री होते,सध्या जलसंपदा मंत्री भाजपात, हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये नंतर भाजपात गेले, तेव्हा ते म्हणाले होते की आता शांत झोप लागते. नारायण राणे, बबनराव पाचपुते, पद्मसिंह पाटील, किरीट सोमय्या यांनी केवढे आरोप केले होते. ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केलेत ते सगळे आज मंत्रीमंडळात आहेत किंवा भाजपात आहेत. त्यांना नाही कोणी विचारायला जात की भूमिका बदलली का ? आपण शिवसेना जन्माला आली तेव्हा १९६६मध्ये त्यांनी पहिली निवडणूक प्रजा समाजवादी बरोबर लढली, मुस्लीम लीग सोबत युती केली. नंतर काँग्रेसलाही पाठींबा दिला, नंतर भाजपासोबत गेले. त्यावेळी जी परिस्थिती असते त्यानुसार पक्ष निर्णय घेत असतो. परंतू त्यांची ती परिस्थिती आणि…म्हणजे त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार असे राज ठाकरे यांनी म्हणताच एक हशा उसळला.
