उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला, मनसेकडून पलटवार; येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकं कपडे…

उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला, मनसेकडून पलटवार; येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकं कपडे…

| Updated on: Jun 20, 2024 | 1:49 PM

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.... काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना, बरोबर की चूक आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला. शिवसेना पक्षाच्या 58 व्या वर्धापन निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काल मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावलेल्या खोचक टोल्यानंतर मनसेकडून पलटवार करण्यात आला आहे. ‘हिरव्या मतांनी थोडाबहू विजय मिळाला आहे. जे पाणचट जोक करत आहे. त्यांचे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कपडे लोकं शाबूत ठेवणार नाहीत’, असे संदीप देशपांडे म्हणाले.

Published on: Jun 20, 2024 01:49 PM