मनसे नेत्यानं काढली राऊतांची लायकी; म्हणाले, ‘उबाठा अपंगांचा पक्ष, आयुष्यभर लोकांच्या कुबड्या… ‘

मनसे नेत्यानं काढली राऊतांची लायकी; म्हणाले, ‘उबाठा अपंगांचा पक्ष, आयुष्यभर लोकांच्या कुबड्या… ‘

| Updated on: Aug 25, 2024 | 2:16 PM

तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून आता मोदी-शाह वाईट झालेत. संजय राऊत आधी मोदी शहांची चाकरी करायचे आता शरद पवार यांची करतात, असे म्हणत जिव्हारी लागणारा पलटवार संजय राऊत यांच्यावर मनसेकडून करण्यात आला आहे. बघा काय केली होती संजय राऊतांनी टीका?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते , खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका कळत नाही, महाराष्ट्राचे दुश्मन असलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरे आहेत.’, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावरच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केला आहे. ‘मुळातच संजय राऊत यांचा बुद्ध्यांक कमी झालाय. शिवसेना उबाठा हा अपंगांचा पक्ष आहे. आयुष्यभर ते लोकांच्या कुबड्या घेऊन चालले. आधी भाजपच्या कुबड्या वापरल्या, नंतर शरद पवार आणि काँग्रेसच्या कुबड्या वापरल्यात. महाराष्ट्राच्या हिताबद्दल बोलावं अशी त्यांची लायकी नाही.’, असे संदीप देशपांडे म्हणाले तर आम्ही मराठीचा द्वेष केला नाही. कोणीही आम्हाला तसं म्हणणार नाही. आम्ही आमचं काम करतोय. मोदी शाहांसोबत तुम्ही होते तेव्हा ते चांगले होते का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय.

Published on: Aug 25, 2024 02:16 PM