Santosh Dhuri : मनसे सोडून संतोष धुरी भाजपात का? कारण देत ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा; ‘त्या’ आरोपामुळे खळबळ!

Santosh Dhuri : मनसे सोडून संतोष धुरी भाजपात का? कारण देत ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा; ‘त्या’ आरोपामुळे खळबळ!

| Updated on: Jan 06, 2026 | 4:47 PM

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. धुरींनी आरोप केला की, त्यांना आणि संदीप देशपांडे यांना पक्षातील चर्चेतून जाणूनबुजून वगळण्यात आले आणि सरेंडर करण्यात आले. ठाकरे गटातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, धुरींनी देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले.

मनसे नेते संतोष धुरी यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. धुरी यांनी आरोप केला की, त्यांना आणि त्यांचे सहकारी संदीप देशपांडे यांना पक्षातील महत्त्वाच्या चर्चांमधून जाणूनबुजून वगळण्यात आले होते. त्यांच्या मते, “वरून असा तह झालेला होता, की त्या तहमध्ये दोन किल्ले सरेंडर केलेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे.” वांद्रे येथील बंगल्यावरून त्यांना कोणत्याही चर्चेत किंवा उमेदवारीसाठी दिसू नये, असे निर्देश होते, असा दावा त्यांनी केला. धुरी यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे ठाकरे गटाने “स्वतःचं रक्त हिरवं केलं” असल्याची टीका केली. या सर्व घडामोडींनंतर, त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांनी त्यांना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडे पाठवले, जिथे त्यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.

Published on: Jan 06, 2026 04:43 PM