MNS News : ‘तु चांदिवलीमध्ये लढला तेव्हा तुला..’, मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन
Mahendra Bhanushali-Sunil Shukla Phone Call : मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी सुनील शुक्ला यांना फोन करून इशारा दिला आहे. या सांभाषणाचं ऑडिओ क्लिप व्हारायल होतं आहे.
सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केलेली आहे. यानंतर मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी सुनील शुक्ला यांना फोनवरून इशारा दिला आहे. मुंबई पोलीस देखील या कॉन्फरन्स कॉलवर उपस्थित असल्याचा दावा भानुशाली यांनी केला आहे. दरम्यान, या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे. दरम्यान, टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
या क्लिपमध्ये भानुशाली शुक्ला यांना म्हणत आहेत की, तु चांदिवलीमध्ये इलेक्शन लढला तेव्हा तुला 300 मतं होते आणि आता तु स्वत:ला उत्तर भारतीयांचा मसीहा सांगतो? त्यावर शुक्ला हे ‘तु काय करणार?’ असं भानुशाली यांना विचारत आहेत. त्यानंतर भानुशाली यांनी कॉन्फरन्स कॉलवर असलेल्या पोलिसांना देखील संभाषणात घेतलेलं ऐकायला येत आहे.
Published on: Apr 10, 2025 09:15 AM
