शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक

| Updated on: Feb 04, 2022 | 10:53 PM

आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिलीय. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआायआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे.

Follow us on

डोंबिवली : जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला (Farmer Family) बेदम मारहाण झाल्याची घटना कल्याण ग्रामीणमधील दहिसर मोकाशी पाडा येथे घडली आहे. या मारहाणीत शेतकरी पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. तर महिलांसोबतही धक्काबुक्कीही करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेतला जात नसल्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या दालनात ठाण मांडले. यावेळी आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील (Raju Patil) यांनी दिलीय. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआायआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे.