BIG Breaking : मनसेचा ठाकरेंच्या सेनेला प्रस्ताव, हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार?
हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला आहे. हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नको, असा मनसेचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय हा मोर्चा निघावा, अशी मनसेची भूमिका असल्याचेही सूत्रांकडून समजतंय.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपआपल्या आंदोलन, मोर्च्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, मनसेकडून 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्याची तारीख आधी 6 जुलै अशी होती मात्र आषाढी एकादशी असल्याने या तारखेत बदल केला असल्याचे सांगितले जात आहे. तर 29 जून आणि 7 जुलैला उद्धव ठाकरे हे दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, सुत्रांकडून अशी माहिती मिळतेय की मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आला आहे की, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी, याकरता दोन मोर्चे किंवा आंदोलनं नको तर एकच मोर्चा निघालाय हवा, त्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं मनसेच्या मोर्चात सहभागी व्हावं, असा प्रस्ताप पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
