MNS : ‘हिंदी’सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं पेटवली होळी अन्…

MNS : ‘हिंदी’सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं पेटवली होळी अन्…

| Updated on: Apr 18, 2025 | 7:12 PM

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसैनिकांनी हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या विरोधात मुंबईसह विविध भागांमध्ये मनसैनिकांनी आंदोलनं केलीत.

राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी मनसे पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यानंतर राज्यभरात मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहेत. तर मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची प्रत फाडली तर कुठे जीआरची होळी करण्यात आली. दरम्यान, मनसेने अनेक ठिकाणी हिंदी सक्तीविरोधात जोरदार आंदोलन केली. हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची प्रत फाडत मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर सुद्धा हिंदी सक्तीचा जीआर फाडण्यात आला. राज ठाकरेंकडून आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, अशी पोस्ट करत हिंदी भाषा सक्तिविरोधात भूमिका स्पष्ट करण्यात आली. तर हिंदीकरणाचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी पोस्टच्या माध्यमातून दिल्याचे पाहायला मिळाले.

नुकतीच मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. ‘अशा प्रगतीनं मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको. आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठी या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे. नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने मराठी जिवंत राहणार नाही’, असं राज ठाकरे म्हणाले.

‘अशी प्रगती नको आम्हाला, मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून…’, राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Published on: Apr 18, 2025 07:12 PM