BMC Elections : मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!

| Updated on: Dec 30, 2025 | 11:29 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मुंबई महानगरपालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत 49 उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म देण्यात आले आहेत, तर उर्वरित फॉर्म आज दिले जातील. उमेदवारांची यादी गुप्त ठेवण्यात आली असून, शेवटच्या क्षणापर्यंत ही गुप्तता पाळली जाणार आहे.

मनसे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 52 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत पक्षाने 49 इच्छुकांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप केले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता पाळली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आजही काही इच्छुक उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म दिले जातील आणि काही नाराज इच्छुकांची समजूत काढण्यात येणार आहे. मनसे मुंबई महानगरपालिकेत किती जागा लढवणार याबद्दल उत्सुकता होती, ती आता संपुष्टात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते मुंबई महानगरपालिकेच्या 52 जागांवर निवडणुकीत उतरणार हे आता निश्चित झाले आहे. या घडामोडींमुळे मुंबईच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

Published on: Dec 30, 2025 11:29 AM