Mumbai | ग्रँटरोड उड्डाण पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत, मनसे कार्यकर्ते आक्रमक

Mumbai | ग्रँटरोड उड्डाण पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत, मनसे कार्यकर्ते आक्रमक

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 4:02 PM

ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या फ्लाय ओवरचं लोकार्पण करून हा फ्लायओवर नागरिकांसाठी खुला करण्यात यावा यासाठी मनसे तर्फे तोडफोड करत आंदोलन करण्यात आलं.

ग्रँटरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या फ्लाय ओवरचं लोकार्पण करून हा फ्लायओवर नागरिकांसाठी खुला करण्यात यावा यासाठी मनसे तर्फे तोडफोड करत आंदोलन करण्यात आलं. ग्रँटरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभारण्यात आलेल्या फ्लाईओवर च बांधकाम होऊन त्याचे उद्घाटन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या फ्लाय ओवरचं लोकार्पण निवडणुकीच्या तोंडावर करण्याचा घाट शिवसेना आणि भाजपने घातलेला असल्यानं मनसे आक्रमक झालेली आहे. पुलाच्या लोकार्पण संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण, त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मनसेनं आज हे आंदोलन केलं आहे