tv9 Marathi Special Report | डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?

tv9 Marathi Special Report | डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 25, 2026 | 12:44 PM

रेल्वेस्टेशनच्या शेजारी अनेक फेरीवाले असतात पण मराठी तरुणीच्या एका छोट्या स्टॉलवरती महापालिकेचे कर्मचारी कारवाई करत असल्यामुळे डोंबिवलीच्या एकता सावंत ह्या तरुणीने संताप व्यक्त केला आहे. दररोज 300 रुपये घेऊन सुद्धा माझ्या स्टॉलवर कारवाई का? असा सवाल एकताने केलाय. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ पाहून मनसे तिच्या मदतीला धावलेत.

रेल्वेस्टेशनच्या शेजारी अनेक फेरीवाले असतात पण मराठी तरुणीच्या एका छोट्या स्टॉलवरती महापालिकेचे कर्मचारी कारवाई करत असल्यामुळे डोंबिवलीच्या एकता सावंत ह्या तरुणीने संताप व्यक्त केला आहे. दररोज 300 रुपये घेऊन सुद्धा माझ्या स्टॉलवर कारवाई का? असा सवाल एकताने केलाय. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ पाहून मनसे तिच्या मदतीला धावलेत. त्या व्हिडीओची दखल राज ठाकरेंनी घेतली आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना एकता सावंत हिला मदत करायच्या सूचना दिल्या. ठाण्याचे मनसेचे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेत एकताला टपरी टाकण्यास सांगितलं आणि त्यासाठी राज ठाकरे स्वतः पालिका आयुक्तांशी बोलतील असा शब्द जाधव यांनी दिला आहे. कायदे सगळ्यांसाठी सारखेच आहेत परप्रांतीयांची अनधिकृत दुकानं रस्त्यावर रोज थाटली जात असतील आणि या मराठी तरुणीलाच टार्गेट केलं जात असेल तर, प्रशासनाला प्रश्न विचारले जातील.

Published on: Jan 25, 2026 12:44 PM