विधानसेभेच्या निकालानंतर मनसेचा पहिला मेळावा, राज ठाकरे उद्या मोठे निर्णय घेणार?

विधानसेभेच्या निकालानंतर मनसेचा पहिला मेळावा, राज ठाकरे उद्या मोठे निर्णय घेणार?

| Updated on: Jan 29, 2025 | 3:11 PM

उद्या वरळी येथे मनसेकडून पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या पहिला राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. उद्या वरळी येथे मनसेकडून पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान राज ठाकरे काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे पक्षातील प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याचीही शक्यता आहे. इतकंच नाहीतर आगामी राजकीय दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे. यावेळी मेळाव्यात निवडणुकीतील कामगिरीचा आढावा, संघटनात्मक फेरबदल आणि आगामी पालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भविष्यातील रणनितीबाबत राज ठाकरे मोठे संकेत देण्याचीही शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. बघा व्हिडीओ…

Published on: Jan 29, 2025 03:11 PM