मोहीत कंबोज यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरूवात
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने भाजप नेते मोहित कंबोज यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने भाजप नेते मोहित कंबोज यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. न्यायालयाने कंबोज यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मोहित कंबोज हे गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिले आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (Indian Overseas Bank) व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (crime of fraud) दाखल केला आहे.
