विदर्भातील 11 जिल्ह्यात मान्सूनची हजेरी, हवामान विभागाची माहिती

| Updated on: Jun 16, 2022 | 1:45 PM

हवामान खात्याकडून पुढच्या पाच दिवसांममध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगडला वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Follow us on

हवामान खात्याकडून पुढच्या पाच दिवसांममध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगडला वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत पावसाने ब्रेक घेतला. आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 19 जून रोजी विदर्भात तर 15 ते 17 जूनदरम्यान मध्य प्रदेशात पावसाचा इशारा दिला आहे. 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर मान्सून दाखल झाला. हवामान अनुकूल झाल्यानंतर शुक्रवाही हा मान्सून वेंगुर्ल्यात दाखल झाला.