Operation Sindoor : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य अन् देशभरातून संतापाची लाट

Operation Sindoor : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य अन् देशभरातून संतापाची लाट

| Updated on: May 14, 2025 | 6:17 PM

भाजपचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्याविरोधात राज्यातील अनेक शहरांमध्ये काँग्रेसने त्यांच्या विरोधात निदर्शने केली. भोपाळमधील काही काँग्रेस नेतेही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. दुसरीकडे, महिला आयोगानेही मंत्र्यांचे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मंत्री विजय शाह यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. अशातच कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भाजपचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने डीजीपींना विजय शाह यांच्याविरुद्ध चार तासांत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले असून विजय शाह यांच्याविरोधात सुमोटो दाखल करा, असे सांगितले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत असे म्हटले की, या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत एफआयआर नोंदवला पाहिजे. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अतुल श्रीधर यांच्या खंडपीठाने विजय शाह यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करावा, असे म्हटले आहे. तर मंत्री विजय शाह यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

काय म्हटले विजय शाह?

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सक्रिय सहभाग असलेल्या कर्नल सोफिया कुरेशींवर विजय शाह यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. विजय शाह यांनी पंतप्रधान मोदींनी “दहशतवाद्यांच्या बहिणीला लष्करी विमानातून हल्ल्यासाठी पाठवले” असे विधान केले. रविवारी इंदूरमधील महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात बोलत असताना मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केलं.  मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटले असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: May 14, 2025 06:17 PM