Sunil Tatkare : .. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
Mumbai Mantralay Traffic : मंत्रालय परिसरात असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका आता मंत्र्यांना देखील बसायला लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज खासदार सुनील तटकरे हे थेट चालतच मंत्रालयात गेल्याचं बघायला मिळालं आहे.
खासदार सुनील तटकरे यांना आज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयातून मंत्रालयात सुनील तटकरे आज पायी चालत गेलेले बघायला मिळाले. मंत्रालयाच्या बाहेरच्या भागात कायमच वाहतूक कोंडीची समस्या असलेली दिसते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर मंत्र्यांना देखील त्रास सहन करावा लागतो. आज देखील अशाच वाहतूक कोंडीमुळे खासदार सुनील तटकरे हे आपला गाड्यांचा ताफा पक्ष कार्यालयाजवळ सोडून पायी मंत्रालायाकडे निघालेले बघायला मिळाले.
Published on: Apr 08, 2025 02:26 PM
