Aurangzeb Treasure Video: ‘छावा’ पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी ‘या’ किल्ल्यावर उडाली झुंबड

Aurangzeb Treasure Video: ‘छावा’ पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी ‘या’ किल्ल्यावर उडाली झुंबड

| Updated on: Mar 08, 2025 | 5:51 PM

औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी हजारो नागरीक बुऱ्हाणपूर येथील किल्ल्यावर दाखल झाले असून गेल्या तीन दिवसांपासून हजारो स्त्री-पुरुषांनी किल्ला आणि परिसरात तळ ठोकल्याचे माहिती मिळतेय

औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी बुऱ्हणपूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. आसीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा पसरली. छत्रपती चित्रपटानंतर नागरिकांमध्ये अफवा पसरल्याची चर्चा आहे. मोबाईल टॉर्च वापरून लोक खजिना शोधत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. खोदकाम करण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. मध्यप्रदेश राज्यातील आसीरगड शिवारातील किल्ला परिसरात या ठिकाणी मुघलकालीन, औरंगजेबाचा खजिना असल्याची अफवा ही मध्यप्रदेशात पसरली आणि परिसरातील काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुघलकालीन खजिना नाणे शोधण्याची मोहीम हाती घेतली. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसीरगड परिसरामध्ये मोठे खड्डे आणि खोदकाम करून नाणे आणि खजिना शोधण्यासाठी लोकांनी हाती फावडे आणि कुदळ घेतल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेबच्या काळातील मुघलकालीन खजिना असल्याची अफवा ही मध्यप्रदेशात पसरल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मध्यरात्री याठिकाणी खोदकाम केलेलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून हजारो स्त्री-पुरुषांनी किल्ला आणि परिसरात तळ ठोकला आहे.

Published on: Mar 08, 2025 05:49 PM