अहमदनगर जिल्हयातील मुळा धरण ओव्हरफ्लो

| Updated on: Aug 15, 2022 | 8:40 PM

पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील(Ahmednagar District) सर्वात मोठे धरण असलेल्या मुळा धरण(Mula Dam) ओव्हरफ्लो(Overflow) झाले आहे. यामुळे धरणातुन पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.  मुळा धरणातुनअहमदनगर शहरासह, शेवगाव, पाथर्डी आणि अनेक तालुक्यातील जनतेची तहान भागवली जाते.

Follow us on

अहमदनगर : राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील(Ahmednagar District) सर्वात मोठे धरण असलेल्या मुळा धरण(Mula Dam) ओव्हरफ्लो(Overflow) झाले आहे. यामुळे धरणातुन पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.  मुळा धरणातुनअहमदनगर शहरासह, शेवगाव, पाथर्डी आणि अनेक तालुक्यातील जनतेची तहान भागवली जाते. 26 टिएमसी क्षमता असलेले मुळा धरण 95% टक्के भरले आहे. धरणाच्या अकरा गेटमधून पाच हजार क्युसेक वेगाने पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नगर जिल्हयातील भंडारदरा, निळवंडे पाठोपाठ मुळा धरण भरल्याने समाधानाचे वातावरण आहे.पाणी सोडतानाचे हे विहंगम दृष्य ड्रोन कॅमेरत कैद झाले आहे.