Mumbai BMC Election : मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं, कोणा-कोणाला संधी?

| Updated on: Dec 29, 2025 | 12:33 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 66 नावांचा समावेश असून, तरुण चेहरे, महिला आणि माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. आकाश पुरोहित, प्रकाश गंगाधरे, उज्वला मोडक, श्वेता कोरगावकर, विनोद मिश्रा, महेश पारकर यांसारख्या प्रमुख नावांचा यात समावेश आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण 66 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. पक्षाने तरुण चेहरे, महिला आणि अनुभवी माजी नगरसेवकांचे एक संतुलित मिश्रण साधल्याचे दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने आतापर्यंत 100 एबी फॉर्मचे वाटप केले आहे, ज्यातून उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. या यादीतील काही प्रमुख नावांमध्ये आकाश पुरोहित (वॉर्ड 221), प्रकाश गंगाधरे (वॉर्ड 104) आणि माजी नगरसेविका उज्वला मोडक (वॉर्ड 74) यांचा समावेश आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या श्वेता कोरगावकर यांना वॉर्ड 16 मधून उमेदवारी मिळाली आहे. विनोद मिश्रा (वॉर्ड 46), प्रीती साटम (वॉर्ड 52), अनिश मकवानी (वॉर्ड 70) आणि महेश पारकर (वॉर्ड 87) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांचे निकटवर्तीय जितेंद्र राऊत यांना वॉर्ड 99 मधून संधी मिळाली आहे. तर, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, प्रभाकर शिंदे, सारिका पवार, जागृती पाटील आणि अश्विनी मते यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भायखळा आणि लालबागसारख्या काही जागांवर शिंदे गट आणि भाजप यांच्यातील उमेदवारीचा तिढा अजूनही कायम असून, तो लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

Published on: Dec 29, 2025 12:33 PM