प्रवाशांनी केलं असं काही की, वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार

प्रवाशांनी केलं असं काही की, वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार

| Updated on: May 01, 2025 | 7:34 AM

आत्तापर्यंत अनेक कारणांनी आपण चालती बस थंबवण्यात आलेली पहिली आहे. मात्र पवईमधून एका विचित्र कारणासाठी बस चालकाने बस थांबवल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.

बसला अपघात झाल्यावर, किंवा बसमध्ये काही बिघाड झाल्यावर बस थंबवण्यात आल्याचा प्रकार आपण कायम ऐकला आहे. मात्र बस खचाखच भरल्याने वैतागलेल्या बस चालकाने चक्क बस थांबवल्याचा प्रकार आता समोर आला आहे. पवईच्या आयआयटी मार्केट परिसरात ही घटना घडलेली आहे. काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. बस प्रवाशांनी एवढी भरली होती की त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचं लक्षात येऊन चालकाने वैतागून बस बाजूला उभी केली. मात्र यामुळे प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. तर गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात वाहतूक कोंडी देखील बघायला मिळाली.

Published on: May 01, 2025 07:34 AM