Mumbai Civic Elections: मुंबईत भाजप + शिंदे सेना… दादांची राष्ट्रवादी नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ! शिवसेनेला किती जागा?

| Updated on: Dec 13, 2025 | 11:42 AM

मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रच लढणार असल्याच निश्चित झालायं. तसंच मुंबईसाठी जागा वाटपाचा आकडाही समोर आलाय.

भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने मुंबईसह ठाण्यातही महायुतीतच लढण्याचं निश्चित झालंय. दोन दिवसांआधी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठकही झाली आणि महापालिकांमध्ये युतीवरही शिक्कामोर्तब झालं. त्याचबरोबर जागांचा फॉर्मुलाही पक्का झाल्याचं कळतंय. मुंबईत महापालिकेच्या 227 जागा आहेत. भाजप 130 ते 140 आणि शिंदेच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा मिळू शकतात. तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा हव्यात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 20 ते 25 जागांची मागणी महायुतीत केली असली तरी भाजप नवाब मलिकांमुळे त्यांना सोबत घेण्यास तयार नाही. मलिकांचे नेतृत्व मान्य नाही असं भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी स्पष्ट केलय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Dec 13, 2025 11:42 AM