Mumbai corona update : आज मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण, संकट अधिक गडद

Mumbai corona update : आज मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण, संकट अधिक गडद

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 8:16 PM

कालही मुंबईत साडे पाच हजार रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे.

मुंबई : आज मुंबईत (Mumbai) तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कालही मुंबईत साडे पाच हजार रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. मुंबईतल्या (Mumbai Corona Update) रुग्णसंख्येचा अभ्यास केला असता बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू इमारती आणि वस्तीमधील असल्याचं समोर आलंय.