Kiran Gosavi | Aryan Khan प्रकरणातील किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: Oct 28, 2021 | 7:14 PM

के. पी. गोसावीवर नोकरी मिळवून देण्याच्या नावाने पैसे लुबाडल्याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तो क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात चर्चेत आल्यानंतर पीडित विद्यार्थी समोर आले होते. तेव्हापासून गोसावी फरार होता. अखेर पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आज त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Follow us on

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच असलेला के. पी. गोसावी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. के. पी. गोसावीवर नोकरी मिळवून देण्याच्या नावाने पैसे लुबाडल्याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तो क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात चर्चेत आल्यानंतर पीडित विद्यार्थी समोर आले होते. तेव्हापासून गोसावी फरार होता. अखेर पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आज त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केपी गोसावीबाबतची माहिती दिली. गोसावीची एक तास कसून चौकशी केल्यानंतर तो कुठे कुठे लपला होता याची माहिती मिळाल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं. गोसावी हा पुणे, मुंबई, लोनावळा, जळगाव, उत्तर प्रदेशातील फत्तेपूर, लखनऊ, तेलंगनातील हैदराबाद आणि मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लपून बसला होता. तो वारंवार लपून बसत होता. त्यामुळे त्याला ट्रेस करणं कठीण जात होतं. मात्र, तो ज्या ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या त्या ठिकाणी आमची टीम गेली होती. त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली होती, असं सांगतानाच आज पहाटे 3 वाजात कात्रजमधील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली, असं गुप्ता यांनी सांगितलं.