GSB Seva Mandal : मुंबईतील ‘सर्वात श्रीमंत बाप्पा’चं दर्शन यंदा होणार ‘कूल’, बघा कशी व्यवस्था अन् कितीचा कोटींचा विमा? रक्कम ऐकून व्हाल थक्क
बाप्पाला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची वाढती किंमत आणि सेवकांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता विम्याची किंमत वाढवली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने मंडळाला हे विमा कवच प्रदान केले आहे. या पॉलिसीमध्ये ऑल रिस्क कव्हर, स्टँडर्ड फायर (आग) आणि स्पेशल पेरिल पॉलिसी (भूकंपाच्या जोखमीसह), सार्वजनिक दायित्व आणि नोकरांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर हे समाविष्ट आहे.
राज्यात यंदा 27 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी असल्याने लाडक्या बाप्पाचं आगमन होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणेशोत्सवाचा उत्साह दिसतोय. घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तयारी देखील सुरू झाली आहे. अशातच मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण मंडळ अर्थात (GSB सेवा मंडळ) याची एक मोठी माहिती समोर आली आहे. दरवर्षी GSB सेवा मंडळ भव्य-दिव्य असं गणपती मंडप उभारतं यासह भाविकांच्या सोयीसाठी देखील विविध उपापययोजना मंडळाकडून राबविल्या जातात. त्याच प्रमाणे यंदाही भाविकांची काळजी या मंडळाकडून घेण्यात आली आहे. यावर्षी GSB सेवा मंडळाने तब्बल 474 कोटींचा विमा उतरवला आहे. यासह भाविकांचाही विमा या मंडळाकडून काढण्यात आला आहे. इतकंच नाहीतर भाविकांना एसीमध्ये दर्शन मिळणार असून गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.
