Mumbai- Goa Expressway : मुंबई- गोवा महामार्गावर कळंबीमध्ये रस्त्याला गेले तडे
Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये रस्ता खचला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे तडे गेलेले आहेत. तर खबरदारी म्हणून स्थानिकांनी या महामार्गावर झाडाच्या फांद्या देखील टाकल्या आहेत. या खचलेल्या रस्त्यावरूनच वाहनांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अतिशय धोकादायक असा हा मार्ग सध्या बनलेला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथे रस्ता खचल्याची घटना घडली आहे. वाळंजगाडी येथील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठे तडे गेले असून रस्ता खचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून रस्ता तात्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिकांनी खबरदारी म्हणून महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असली तरी आज रात्रीपासून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
Published on: Jun 16, 2025 03:26 PM
