Mumbai Crime : मुंबई हादरली… त्याचा तिच्यावर चाकूहल्ला नंतर स्वतःवरही केले वार अन् जागीच मृत्यू, कुठं घडली खळबळजनक घटना?

Mumbai Crime : मुंबई हादरली… त्याचा तिच्यावर चाकूहल्ला नंतर स्वतःवरही केले वार अन् जागीच मृत्यू, कुठं घडली खळबळजनक घटना?

| Updated on: Oct 24, 2025 | 1:17 PM

मुंबईतील काळाचौकी परिसरात एका तरुणाने तरुणीवर चाकू हल्ला करत स्वतःवरही वार केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आस्था सर्जिकल होमजवळ ही घटना घडली. पोलीस घटनेमागचे कारण शोधत असून, दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

मुंबईच्या काळाचौकी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला करून नंतर स्वतःवरही वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आस्था सर्जिकल होम या परिसरातील ही घटना असल्याचे वृत्त आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तरुण तरुणीचा पाठलाग करत होता. स्वतःला वाचवण्यासाठी ती एका नर्सिंग होममध्ये शिरली. मात्र, तिथेही तरुणाने तिच्यावर चाकू हल्ला केला आणि नंतर स्वतःचा गळा चिरून घेतल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण, हे प्रेमसंबंधातून घडले की आणखी काही, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, दोघांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

Published on: Oct 24, 2025 01:17 PM