Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळाचा मुंबईला धोका! समुद्र खवळलेलाच… कोकण किनारपट्टीसाठी घेतला मोठा निर्णय

Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळाचा मुंबईला धोका! समुद्र खवळलेलाच… कोकण किनारपट्टीसाठी घेतला मोठा निर्णय

| Updated on: Oct 30, 2025 | 11:42 AM

मोंथा चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि विशेषतः मुंबईमध्ये सतर्कता वाढली आहे. अरबी समुद्रातील जोरदार वाऱ्यांमुळे हवामान अस्थिर झाल्याने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मांडवा-गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोंथा चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे कोकण किनारपट्टीवर, विशेषतः मुंबईच्या किनारी भागात, जलवाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे हवामान अस्थिर झाले आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत हा निर्णय कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, किनारपट्टीवर विशेष सतर्कता बाळगली जात आहे. मोंथा चक्रीवादळाचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या निर्देशानुसार, मासेमारांनी समुद्रात जाऊ नये आणि किनारपट्टीवरील शेतकऱ्यांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. टीव्ही नाईन मराठीसाठी अमित शिगवण यांच्यासह गिरीश गायकवाड यांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरातून या स्थितीचा आढावा घेतला.

Published on: Oct 30, 2025 11:42 AM