Lalbaugcha Raja 2025 : सोनं-नाणं, चांदीच्या वस्तूंसह राजाच्या चरणी क्रिकेट बॅट! दानात पैशांच्या पाऊस, पेटीतील ऐवजाची मोजदाद सुरू

Lalbaugcha Raja 2025 : सोनं-नाणं, चांदीच्या वस्तूंसह राजाच्या चरणी क्रिकेट बॅट! दानात पैशांच्या पाऊस, पेटीतील ऐवजाची मोजदाद सुरू

| Updated on: Aug 28, 2025 | 12:57 PM

दरवर्षी लालबागचा राजाला भरभरून दान आणि देणगी भाविक देत असतात. त्याची माहिती मंडळाच्या वतीने दिली जाते. राजाच्या दानपेटीत किती देणगी जमा होते, याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी लोकांमध्येही कुतूहल नेहमी असतं

नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागचा राजा विराजमान झाल्यापासून त्यांचं दर्शन घेण्यास मुंबई, महाराष्ट्र नाही तर देशभरातून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि दिग्गज मंडळी देखील हजेरी लावतात. दरम्यान, गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते. असं म्हटलं जातं की लालबागचा राजा नवसाला पावतो. त्यामुळे नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक लालबागाच्या राजाला मोठ्या प्रमाणात दान अर्पण करत असतात.

गणेशोत्सवाची सुरूवात झाल्यावर दुसऱ्या दिवासापासून लालबागच्या चरणी दान केलेल्या वस्तू, पैशांची मोजदाद सुरू करण्यात येते. ही मोजदाद बँक ॲाफ महाराष्ट्र आणि जी एस महानगर बँकचे कर्मचारी करत असतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा उपयोग गरजू, सर्वासामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करत असते. लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे खजिनदार मंगेश दळवी आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सध्या ही मोजदाद सुरू करण्यात येत आहे.

Published on: Aug 28, 2025 12:44 PM