Mumbai Mayor Kishori Pedanekar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Mumbai Mayor Kishori Pedanekar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 6:24 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज (20 जुलै) परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत.

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज (20 जुलै) परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते. रविवारी (18 जुलै) सकाळी किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दोन दिवसांच्या उपचारांनंतर आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Mumbai Mayor Kishori Pedanekar discharged from hospital)