Kishori Pednekar | नागरिकांनी मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jan 07, 2022 | 12:23 PM

सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. नागरीकांनी घरातून बाहेर पडताना मस्क घालावा आणि योग्य ती काळजी घ्यावी अशी विनंती महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली 

Follow us on

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी मुंबईत तर झपाट्याने संसर्ग वाढतोय. सध्या मुंबईत 20 हजारपेक्षा जास्त सक्रिय कोरोना  रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, रुग्णांची संख्या वीस हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांनी सांगितले होते. पेडणेकर यांच्या या भाष्यानंतर आता पुढे काय होणार ?  मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. नागरीकांनी घरातून बाहेर पडताना मस्क घालावा आणि योग्य ती काळजी घ्यावी अशी विनंती महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली