भाजप नगरसेवक आक्रमक होणार म्हणजे चांगल्या कामांना विरोध करणार का?, किशोरी पेडणेकर यांचा सवाल

भाजप नगरसेवक आक्रमक होणार म्हणजे चांगल्या कामांना विरोध करणार का?, किशोरी पेडणेकर यांचा सवाल

| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 1:13 PM

अधिक आक्रमक व्हा म्हणजे चांगल्या कामांना विरोध करा, असं वाटतंय. भाजप म्हणते की आम्ही संपूर्ण मुंबई काबीज करणार आहे परंतु त्यांच्या नगरसेवकांचा कामाचा आढावा त्यांनी घेतला पाहिजे. भाजपचे दोन-तीन नगरसेवक वगळता सक्रिय असं कोणी मला दिसत नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. भाजपच्या (BJP) स्वबळावर मुंबईवर (Mumbai) कब्जा मिळवण्याच्या दाव्यावर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात शिवसेना सत्तेत आहे. आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे या वेळेस सुद्धा शिवसेना बहुमताने पालिकेत सत्तेत येईल हा आमचा विश्वास आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं. अधिक आक्रमक व्हा म्हणजे चांगल्या कामांना विरोध करा, असं वाटतंय. भाजप म्हणते की आम्ही संपूर्ण मुंबई काबीज करणार आहे परंतु त्यांच्या नगरसेवकांचा कामाचा आढावा त्यांनी घेतला पाहिजे. भाजपचे दोन-तीन नगरसेवक वगळता सक्रिय असं कोणी मला दिसत नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.