मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद

| Updated on: Dec 07, 2025 | 1:58 PM

मुंबईत भाजपचाच महापौर होणार, मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यामुळे शिंदे सेनेचे नेते आक्रमक झाले. आमच्यामुळे भाजपची ताकद वाढली, असे म्हणत शिंदे सेनेने महापौरपदावरील आपला दावा कायम ठेवला. यानंतर भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी महायुतीचाच महापौर असे स्पष्टीकरण देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला.

मुंबईच्या महापौरपदावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, असे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गट अक्षरशः तुटून पडला.  शिंदे सेनेच्या नेत्यांनी लोढांच्या या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर शिंदे सेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी “लोढांनाच मुंबईचा महापौर व्हायचंय का?” असा सवाल उपस्थित केला. तर, मंत्री शिरसाट यांनी महायुतीचाच महापौर होईल, असे सांगत शिंदे सेनेचाही या पदावर दावा असल्याचे संकेत दिले. शंभूराज देसाई यांनी भाजपची ताकद शिंदे यांच्या भूमिकेमुळे वाढली असल्याचा दावा केला. भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल आणि महायुतीचाच महापौर होईल, असे सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Published on: Dec 07, 2025 01:58 PM